मुख्यपृष्ठ > District > वर्तमान बातमी

ना.आशिष जयस्वाल धावले कॅन्सरशी झुंज देत असलेल्या महिला पदाधिकाऱ्याच्या मदतीला

Shivsena
१ मे, २०२५ रोजी ०२:१९ PM
ना.आशिष जयस्वाल धावले कॅन्सरशी झुंज देत असलेल्या महिला पदाधिकाऱ्याच्या मदतीला

गडचिरोली: जिल्हा शिवसेना मागासवर्गीय विभागाच्या अध्यक्षा निता वडेट्टीवार यांच्या घरी भेट देवुन केली तब्येतीची विचारपूस केली. आपल्या पक्षातील तळागाळात काम करण्याऱ्या शेवटचा कार्यकर्ता अडचणीत सापडला असताना त्याची माहिती कानावर पडताच तीच्या मदतीला तात्काळ धावून जावून माणुसकी जोपासण्याचे औदार्य दाखविले ते राज्याचे वित्त व नियोजन कृषी, मदत व पुनर्वसन, कामगार राज्यमंत्री, तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री अँड.आशिष जयस्वाल यांनी . गडचिरोली जिल्हा शिवसेना मागासवर्गीय विभागाच्या महीला जिल्हाध्यक्षा नीता वडेट्टीवार यांना कॅन्सर रोगाने गाठले. त्या कॅन्सरशी झुंज देत उपचार घेत आहेत.. याची माहिती ना.आशिष जयस्वाल यांना कळताच त्यांनी 1 गुरूवारी त्वरित शिवसेना पदाधिकाऱ्या समवेत गडचिरोली येथे नीता वडेट्टीवार यांच्या घरी भेट दिली व त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस करीत त्यांना तात्काळ आर्थिक मदत केली शिवाय पुढील उपचारासाठी सर्वोतपरी मदत करण्याची तयारी दाखविली. आणि त्यांच्यातील संवेदनशिलतेचा परिचय करुन दिला. ना.आशिष जयस्वाल हे हाडाचे शिवसैनिक गोरगरिब ,सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीला एका हाकेवर धावून जाण्याची त्यांची प्रवृत्ती. आपल्याच पक्षाच्या व सहपालक मंत्री असलेल्या गडचिरोली च्या पदाधिकारी निता वडेट्टीवार या संकटाशी दोन हात करत असताना याची माहिती कळताच त्यांच्यातील मायेचा पाझर फुटला अन् तात्काळ त्यांनी आर्थिक मदत देत शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांना त्यांच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष देण्याची सूचना करत उपचारासाठी आवश्यक ती मदत आपण करणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, युवा सेना जिल्हा प्रमुख दीपक भारसाकडे, अरबाज शेख कल्पक मुपीडवार रक्षीत पोट्वार व ईतर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जनतेशी आणि कार्यकर्त्यांशी घट्ट नाळ जोडणारे तळागाळात काम करण्यारे कार्यकर्त्यांच्या मदतीला एका हाकेवर धावून जाणारे कार्य तत्पर मंत्री आशिष जयस्वाल यांनी दाखविलेल्या संवेदनशिलते व माणुसकी बद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी त्यांचे आभार मानले

ही बातमी शेअर करा