मुख्यपृष्ठ > District > वर्तमान बातमी

सुरजागड परिसरातील नवीन विज पारेषण वाहिनी पासून नागरिकांनी सावध राहावे... प्रशासनाच्या सूचना

Pro lloyd
२० मे, २०२५ रोजी ०६:१९ AM
सुरजागड परिसरातील नवीन  विज पारेषण वाहिनी पासून नागरिकांनी सावध राहावे... प्रशासनाच्या सूचना

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत 132 के.व्ही. एटापल्ली ते सुरजागड द्विपथ अति उच्च दाब विद्युत वाहिनीचे काम पुर्ण झालेले आहे व या विद्युत वाहिनीतुन दि. 19.05.2025 ला किंवा त्यानंतर केव्हाही विद्युत प्रवाह सोडण्यात येईल. प्रस्तुत विज पारेषण वाहिनी मौजा- पांडेवाही, डुमे, एटापल्ली, एटापल्ली टोला, एकरा बु., एकरा खु.,पेठा, बांदे व हेडरी ता. एटापल्ली, जि. गडचिरोली या शिवारातून जात आहे. सर्व नागरीकांना/संबंधितांना सुचित करण्यात येते की, दि. 19.05.2025 किंवा त्यानंतर सदर वाहिनीच्या मनो-यावर चढू नये तसेच मनो-याला गुरेढोरे बांधु नये किंवा विज पारेषण वाहिनीच्या खालून उंच शिडी, धातुची खांबे, धातुचे उंच सामान वगैरे नेवू नये. अशा गोष्टीपासून सर्वानी दूर रहावे कारण तसे करणे धोक्याचे आहे. तरी *सर्व लोकांनी योग्य ती खबरदारी घेवून सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करावे.* जाहिर सुचना भारतीय विद्युत कायदा 2003 अनुसार प्रस्तुत करण्यात येत आहे. असे आवाहन कार्यकारी अभियंताअउदा प्रकल्प विभागम.रा.वि.पा.कं. मर्या, चंद्रपूर यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा

संबंधित बातम्या